Daily Mahasatta

Daily Mahasatta

आटपाडीत २०० खाटांचे रुग्णालय सुरु करा : सादिक खाटीक


: सादिक खाटीक यांची जयंत पाटील, राजेश टोपे यांच्याकडे मागणी

आटपाडी  ( प्रतिनिधी )
             तालुक्यातील कोरोना रुग्णांसाठी आटपाडी येथे अतिदक्षता विभागाच्या ५० खाटांचे आणि इतर रुग्णांसाठी १५० अतिरिक्त खाटांचे असे २०० खाटांचे रुग्णालय तातडीने उभे करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक यांनी केली आहे .
           राज्याचे जलसंपदा मंत्री तथा सांगली जिल्हयाचे पालकमंत्री जयंतराव पाटील आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना पाठविलेल्या ईमेल निवेदनाद्वारे ही मागणी  केली आहे . 
              आटपाडी तालुक्यातील कोविड-१९ च्या संदर्भात आजची परिस्थिती लक्षात घेता २६४  बाधीत  रुग्णांची संख्या झाली आहे. दररोज किमान १५ ते २० रूग्ण मिळून येत आहेत. बरेच रुग्ण आता गंभीर अवस्थेमध्ये रुग्णालयात येत आहेत. आज आटपाडी तालुक्यातील आरोग्य यंत्रणा उत्तम काम करीत असुनही नजीकच्या काळात ही व्यवस्था कमी पडणार आहे .
               आटपाडी तालुक्यातील कोविड-१९ चे रुग्ण अपुऱ्या सुविधांमुळे मिरज येथे संदर्भित करण्यात येत आहेत. आटपाडी येथेच काही गोष्टींमध्ये सुधारणा केलेस अनेक लोकांना त्याचा लाभ होणार आहे. आटपाडी मध्ये १५० खाटांची अतिरिक्त व्यवस्था करण्याची गरज वाटत आहे. सध्या असलेली खाटांची संख्या अपुरी पडत आहे. लक्षणे नसलेल्या रुग्णांना घरीच उपचार दिले जात आहेत. सौम्य व मध्यम लक्षणाच्या रुग्णांसाठी अतिरिक्त सोय करणे गरजेचे आहे. गंभीर रुग्णांसाठी ५० खाटांच्या अतिदक्षता विभागाची सोय करणे गरजेचे आहे. १० खाटांसाठी ची व्हेंटिलेटर ची सोय करणे आवश्यक आहे .कोव्हीड  रुग्णांच्या निदानासाठी डिजिटल एक्स रे ची सोय आवश्यक आहे. रक्त व लघवी तपासणीसाठी स्वतंत्र लॅबची गरज आहे. दोन अत्याधुनिक रुग्णवाहिका  अत्यंत आवश्यकता आहेत.
           सध्या आटपाडीत एक एम.डी. डाॅक्टर कार्यरत आहेत. अजुन ४ ते ५  एम. डी. डॉक्टरांची आवश्यकता आहे. ते तातडीने उपलब्ध करून दिले जावेत. नवीन जुन्या खाटांच्या च्या प्रमाणात स्टाफ व इतर साहित्याची अति आवश्यकता असून या सर्व बाबी अत्यंत महत्वाच्या असून आपल्या महाआघाडी सरकारच्या माध्यमातून त्या तातडीने उपलब्ध करून दिल्या जाव्यात अशी मागणी  सादिक खाटीक यांनी केली आहे .

 

Post a Comment

0 Comments