Daily Mahasatta

Daily Mahasatta

वाळवा तालुक्यात कहर ; आज १०२ कोरोना पाॅझीटीव्ह

इस्लामपूर ( हैबत पाटील)
          वाळवा तालुक्यात आज उच्चांकी १०२ रुग्णांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी मोठ्याप्रमाणात वाढली आहे.
           वाळवा तालुक्यातील रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून तालुक्यात आज नव्याने १०२ जणांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील रुग्णांची संख्या आता ८७४ वर पोहचली आहे. यामधील इस्लामपूर शहरातील ६३ जणांचा समावेश असल्याची माहिती आरोग्य अधिकारी साकेत पाटील यांनी दिली.
         तालुक्यातील मोठ्या संख्येत रुग्ण पॉझिटिव्ह येताना दिसत आहेत. त्यामुळे तालुक्याबरोबर इस्लामपूर शहरात घबराटीचे वातावरण आहे. आज पुन्हा नव्याने १०२ रुग्णांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले असून यामध्ये ६७ पुरुष व ३५ महिलांचा समावेश आहे. आज तालुक्यातील ज्या गावात कोरोना रुग्ण सापडलेत त्यांची संख्या पुढील प्रमाणे:इस्लामपूर ६३, बोरगाव ३, जुनेखेड २, वाळवा १, पडवळवाडी १, कोरेगाव १, कारंडवाडी ५, आष्टा २, नेर्ले ३, नावेखेड ६, बागणी १, केदारवाडी १, कामेरी १, तांबवे ४, कासेगाव ८, रेठरे धरण १ यांचा समावेश आहे. 

Post a Comment

0 Comments