Daily Mahasatta

Daily Mahasatta

शांताराम (बापू) कदम यांच्यासह कुटुंबातील चौघे कोरोना पाॅझीटीव्हकडेगाव ( सचिन मोहिते)

       आमदार  मोहनराव कदम (दादा ) यांचा कोरोना अहवाल  पॉझिटिव्ह आल्यानंतर आता आ. कदम यांच्या पत्नी सौ.यशोदा मोहनराव कदम व त्यांचे पुत्र सागरेश्वर सुतगीरणीचे अध्यक्ष शांताराम (बापू) कदम व नातू दिग्विजय कदम यांना  कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले  आहे. त्यामुळे आज आम्.कदम यांच्या कुटुंबातील चौघे कोरोना पाॅझीटीव्ह झाले.
       आमदार मोहनराव (दादा) कदम यांचे सुपुत्र व भारती हॉस्पिटल सांगलीचे मानद संचालक डॉ.हणमंतराव कदम व नातू डॉ. जितेश  तसेच  त्यांच्या  मातोश्री यांना  कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर आज १५ ऑगस्ट रोजी  आमदार मोहनराव कदम (दादा) यांचेसह कुटुंबातील  चौघांचा  कोरोनाची चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याशिवाय  आमदार मोहनराव कदम (दादा) यांचे  वाहन चालक , शांताराम कदम यांचे स्वीय सहाय्यक तसेच या कुटुंबियांच्या संपर्कातील एक तरुण यांचे  रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत .


Post a Comment

0 Comments