Daily Mahasatta

Daily Mahasatta

कडेगावात गणेशोत्सवाबाबत ऐतिहासिक निर्णय, महाराष्ट्रात आदर्श ठरणार


कडेगाव : सचिन मोहिते
          कडेगाव पोलिस ठाणे हद्दीतील सर्व  ३९ गावांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक बिपिन हसबनीस, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव या अधिकार्यांनी प्रत्येक गावातील कोव्हीड १९ आपत्ती ग्राम समिती, पोलिस पाटील व गावातील गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते यांच्या बैठका घेऊन त्यांना कोरना विषाणू संसर्गाचे पार्श्वभूमीवर शासनाचे आदेशाचे काटेकोर पालन करणेबाबत मार्गदर्शन केले.त्यानुसार सर्वसंमतीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
          कोरोना विषाणू संसर्गाचे अनुषंगाने पोलीस ठाणे हद्दीतील सर्व गणेश मंडळांनी कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यास सहकार्य म्हणून यावर्षी कोणीही सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते. याला कडेगाव पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या सर्व ३९ गावांनी प्रतिसाद देत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे.
          शासनाने केलेल्या आवाहनानुसार सर्व गणेश मंडळांनी रक्तदान शिबिर, सँनेटायझर, मास्क, हॅन्ड ग्लोज वाटप करणार असले बाबतचा निर्णय काही गणेशोत्सव मंडळांनी घेतलेला आहे. कोरोनाच्या भीषण संकटात या सर्व गावातील सूज्ञ नागरिकांनी घेतलेला हा निर्णय संपूर्ण महाराष्ट्राला आदर्श ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments