Daily Mahasatta

Daily Mahasatta

अन्यायकारक वीज बिले माफ करा : भाजप युवा मोर्चा


कनिष्ठ अभियंता माने यांना निवेदन देताना भाजपा युवा मोर्चा सांगली जिल्हा उपाध्यक्ष अभिजीत महाडिक सचिन माने, अविनाश माने, विश्वजीत महाडिक.

: चिंचणीतील युवा कार्यकर्त्यांनी दिले निवेदन

चिंचणी ( कुलदीप औताडे )
            वीज वितरण कंपनीने लॉकडाऊन काळातील घरगुती वीज ग्राहकांना वाढीव बिलाचा शॉक दिला आहे. तसेच वीज युनिटचे दरवाढ करून ग्राहकांची लुट चालवली आहे. ग्राहकांना दिलेले वाढीव रक्कमेची वीज बिले माफ करण्यात यावीत, अशा मागणीचे निवेदन भाजपा युवा मोर्चा सांगली जिल्हा उपाध्यक्ष अभिजीत महाडिक यांनी महावितरण चे कनिष्ठ अभियंता श्री माने यांना दिले.
              कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे गेले तीन महिने लॉकडाऊन सुरू आहे. महावितरण कंपनीने घरगुती वीज ग्राहकांना लॉकडाऊन कालावधीत चुकीची व जादा रक्कमेची बिले दिली आहेत. तसेच वीज युनिटचे दर वाढ करून ग्राहकांना शॉक दिला आहे. लॉकडाऊन कालावधीत ग्राहकांना दिलेली चुकीची व जादा रक्कमेची बिले माफ करावीत. तसेच वीज युनिटची केलेली दरवाढ रद्द करण्यात यावी.लॉकडाउन मध्ये वेळोवेळी लाइट ही नसते यामुळे परिसरातील उद्योग व्यवसायवार ही मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो आहे या मागणीचा विचार करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी युवा मोर्चा च्या वतीने दिला आहे.
             यावेळी श्री.सचिन माने,अविनाश माने,विश्वजीत महाडिक,बालाजी माने,आकाश पाटिल,अक्षय पाटिल,सोमनाथ जाधव,किरण पाटिल,जयंत पाटिल उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments