Daily Mahasatta

Daily Mahasatta

कुपवाड मध्ये जुगार अड्ड्यावर छापा

दोन लाखाचा मुद्देमाल हस्तगत : आठजण ताब्यात
कुपवाड (प्रमोद अथणीकर)
         कुपवाड परिसरामधील दत्तनगर या भागातील जुगार अड्डयावर छापा टाकून पोलीसांनी तब्बल दोन लाखांचा ऐवज हस्तगत करून आठ जणांना ताब्यात घेतले आहे
          पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुपवाड परिसरामधील दत्तनगर या भागात आठ लोक पत्त्याच्या पानांनी जुगार खेळत असल्याचे माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार कुपवाड पोलीसांनी याठिकाणी छापा टाकून सॅमसंग, टागो ,कार्बन व जिओ असे वेगवेगळ्या कंपनीचे सात मोबाईल व दोन चाकी गाड्या यामध्ये बजाज व हिरो या कंपनीच्या चार गाड्या व रोख रक्कम 5460 रुपये असे एकूण 2 लाख 2 हजार 960 रुपये इतक्या रकमेचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
हा जुगार दत्तनगर भागातील सिद्राम गुरूपाद तिग्निबिद्री याच्या खोलीत जुगार सुरू असताना मोहिद्दिन अबूबकर मुल्ला (वय वर्षे 40 रा. कदम गल्ली, जाखले, जि. कोल्हापूर,) भीमराव मल्लाप्पा वाणी (वय 35 रा सांगलीवाडी ता. मिरज, विनोद बाळू खोत (वय 35 रा कृपामाई हॉस्पिटल मिरज , राहुल श्रीरंग खांडेकर (वय 32 रा अष्टविनायक कॉलनी सांगली) , कल्लाप्पा रामा कोंडे (वय 54 रा. अवधूत कॉलनी कुपवाड) , संजय बबन करचे (वय 38 रा. सावळी ता मिरज) व असलम ईलाई समलीवाले वय 50 रा हमालवाडी, कुपवाड अशा आठजणांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक जाधव करीत आहेत

Post a Comment

0 Comments