Daily Mahasatta

Daily Mahasatta

सोनहिरा खोऱ्यात अतिवृष्टी, सोनहिरा तलाव तुडुंब भरला; स्वयंचलित दरवाजा उघडल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा


चिंचणी-(कुलदीप औताडे)
           दोन दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे सोनहिरा तलाव पाण्याने तुडुंब भरलेला आहे. तसेच तलावाचा स्वयंचलित दरवाजा मधील एक दरवाजा काल रात्री उघडला आहे.
         या तलावाची पाणी क्षमता १५७ दशलक्ष घनफूट इतकी असुन हा तलाव पूर्ण भरल्यामुळे अगोदरच १०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू केला होता .परंतु सततच्या पावसामुळे काल रात्री एक स्वयंचलित दरवाजा उघडला आहे.पाण्याचा विसर्ग प्रचंड वेगाने होत असल्यामुळे सोनहिरा खोऱ्यातील काही ओढ्याच्या पुलांवर पाणी आले आहे. त्यामुळे
पुलांवर पाणी असताना पूल ओलांडू नये तसेच सोनहिरा काठावरील नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन ताकारी योजनेचे शाखा अधिकारी संजय पाटील यांनी केले आहे .

Post a Comment

0 Comments