Daily Mahasatta

Daily Mahasatta

विट्यासह तालुक्यात आज १० कोरोना पाॅझिटीव्ह      विटा, प्रतिनिधी
        खानापूर तालुक्यात  कोरनाग्रस्तांचा आकडा झपाट्याने वाढू लागला असून आज एकाच दिवशी विटा शहरातील तीन, वेजेगाव चे तीन आणि चिखलहोळचे चार असे एकूण दहा रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
          कोरोनाच्या बाबतीत सांगली जिल्ह्यातील सर्वात सुरक्षित  तालुका म्हणून खानापूर तालुका ओळखला जात होता.  मात्र कोरोनाने आता तालुक्यात जोरदार एण्ट्री केली आहे. आतापर्यंत 74 रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आज एकाच दिवशी विटा शहरातील 70 वर्षे पुरुष, 38 वर्षीय महिला, 32 वर्षीय महिला असे तिघांचे कोरोना चाचणी अहवाल  पॉझिटिव आले आहेत. यामध्ये पालिकेच्या वॉर्ड ऑफिसरच्या पत्नीचा समावेश आहे. तसेच वेजेगाव येतील साठ वर्षे पुरुष, 22 वर्षीय पुरुष आणि वीस वर्षे पुरुष असे तिघा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर चिखलहोळ  मधील कोरोना पॉझिटिव पेशंट च्या संपर्कात आलेल्या 53 वर्षे पुरुष, 65 वर्षीय महिला 42 वर्षीय महिला आणि  17 वर्षे पुरुष असे चौघा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे एकाच दिवशी दहा जणांना कोरोना ची लागण झाली आहे. तालुक्यात आत्तापर्यंत एकूण 74 रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी 34 रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे तर सध्या 40 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, ची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल लोखंडे यांनी दिली आहे

Post a Comment

0 Comments