आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण


: कराडच्या कृष्णा हाॅस्पीटल मध्ये दाखल
सांगली (प्रतिनिधी )
           महाविकास आघाडी सरकारमधील राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोना ची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल नुकताच पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांना कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे. दरम्यान मंत्री जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, अशोकराव चव्हाण यांच्यानंतर आता सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनादेखील कोरोनाची लागण झाल्यामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे

Post a comment

0 Comments