खानापूर तालुक्यात आणखी चार पॉझिटिव्ह


आज बुधवार दुपारपर्यंत अकरा रुग्ण पॉझिटिव्ह
सांगली ( राजेंद्र काळे )
        आज बुधवार ता. 15 रोजी सकाळी अकरा वाजेपर्यंत विटा शहरातील तीन रुग्णासह मंगरूळ दोन आणि गार्डी, वेजेगाव येथील प्रत्येकी एक रुग्ण असे सकाळी सात रुग्ण आढळून आले होते.
    आता दुपारपर्यंत आलेल्या अहवालात आणखी चारजणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये वेजेगावची 40 वर्षीय स्त्री, 15 वर्षीय मुलगा 23 वर्षीय स्त्री आणि 55 वर्षीय स्त्री अशा एकाच गावातील चौघांचा समावेश आहे, असे माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल लोखंडे यांनी दिली आहे. आज दुपारपर्यंत तालुक्यातील 11 नवीन रुग्णांची वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Post a comment

0 Comments