Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगलीत आज महापुराचा तडाखा बसणार

 

: सांगलीत पाणी पातळी 35 ते 37 फुट पर्यंत जाणार

: पालकमंत्री जयंत पाटील यांची माहिती

सांगली,  प्रतिनिधी

        कोयना आणि वारणा धरण क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे दोन्ही धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सांगली शहरातील आयर्विन पुलाजवळ आज रात्री पर्यंत 35 ते 37 फुटापर्यंत पाण्याची पातळी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट, कर्नाळ  रोड या परिसरात नागरिकांना  महापुराचा तडाखा बसण्याची शक्यता आहे.

    कोयना आणि चांदोली धरण क्षेत्रात गेल्या दोन-तीन दिवसापासून अतिवृष्टी होत आहे. धरणातील पाण्याचे नियोजन करण्यासाठी सध्या कोयना धरणातून 50 हजार क्युसेक  तर चांदोली धरणातून 30 हजार क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे.  सध्या सांगली शहरात आहे आज ता. 16 रोजी दुपारपर्यंत कृष्णा नदीची पातळी 26 फुटावर आहे. सायंकाळपर्यंत या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊन ही पातळी 35 ते 37 फुटापर्यंत जाण्याची शक्यता आहे. असे झाल्यास नदीकाठच्या सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट, कर्नाळ रोड, काका नगर दत्तनगर या परिसरात पाणी घुसणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

        पालक मंत्री जयंतराव पाटील यांनी याबाबत अधिक माहिती अधिक माहिती दिली आहे. कोयना आणि वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे सांगली शहरात आयर्विन पुलाजवळ पाणी पातळी 35 फुटापर्यंत जाण्याची शक्यता आहे. तसेच यामध्ये एक दोन फुटाचा फरक पडू शकतो. कोयना, वारणा, उरमोडी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अन्य धरणातून असा महाराष्ट्रातून सुमारे सव्वा लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग  होणार आहे. तर अलमट्टी धरण व्यवस्थापनाशी याबाबत चर्चा करून अलमट्टी धरणातून दीड लाख क्युसेक इतका विसर्ग  करावा अशी विनंती केली आहे. दोन्ही राज्यांच्या समन्वयातून यावेळी महापुराचा प्रश्न बिकट होणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे.

         सद्या महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे अधिकारी,  कर्मचारी नदीकाठच्या परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी सुचना आणि नियोजन करत आहेत.


सांगली : सूर्यवंशी प्लॉट, जामवाडी येथील नागरिकाना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या सूचना करताना सांगली महापालिकेचे कर्मचारी .


Post a Comment

0 Comments