बाप्पा येणार..कोरोना जाणार ; कुपवाड शहरातील विक्रेत्यांचा विश्वास

कुपवाड ( प्रमोद अथणीकर)
          गेल्या चार महिन्यापासून कोरोना संकटाच्या दडपणाखाली असलेली बाजारपेठ आता गणरायाच्या आगमनाने पुन्हा एकदा फुलून जाऊ लागली आहे. गणपती बाप्पांच्या मूर्ती आणि सजावटीच्या साहित्यांचे स्टॉल कुपवाड शहरात लागण्यास सुरुवात झाली आहे. अशावेळी बाप्पा.. येणार आणि कोरोना जाणार ' असा आशावाद काही विक्रेत्यांनी महासत्ता सांगली न्यूज पोर्टल्सशी बोलताना व्यक्त केला.
          कुपवाड शहरात गणरायाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. कोरोनाने संपूर्ण देशात लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. मात्र विघ्नहर्त्या गणरायाच्या स्वागतासाठी सर्वच लोक सज्ज आहे आहेत. कुपवाड शहरात गणेश मूर्तीचे स्टॉल लावण्यासाठी पत्र्याचे शेड मारून तयारी सुरू झाली आहे. इलेक्ट्रॉनिक दुकानांमध्ये लायटिंगच्या माळा, मूर्ती, आसन, पाठ, तसेच मूर्तीस सजवण्यासाठी लागणारे हार, मुकुटे गणपती बाप्पा मोरया असे लिहिलेले डोक्या वरील पट्या असे नवनवीन व्हराईटी मधील वस्तू विक्रीस आणण्यात दुकानदार व्यस्त झाले आहे
             गणरायाचे अगमनाकडे नागरिकाचे लक्ष लागून राहिले आहे तर मूर्तिकार गणेश मुर्ती चे रंगरगोटीचे राहिलेले अपुरे काम पूर्ण करण्यासाठी अहोरात्र जागून मुर्ती वरील नक्षीकाम पूर्ण करण्यात दंग झाले आहेत
तसेच कुपवाड मधील गणेश मंडळांनी यावर्षी गणेशउत्सव साजरा करण्यासाठी मुर्ती ठरवण्यासाठी मंडळातील कार्यकर्ते गणेशमुर्ती स्टॉल वरती सोशल लगबग सुरू आहे. या विक्रेत्यांच्या विश्वास आहे..बाप्पा येणार..कोरोना जाणार..हा विश्वास मात्र विघ्नहर्त्या बाप्पांनी सार्थ ठरवून कोरोनाचे संकट संपवून टाकावे, अशीच प्रार्थना कुपवाड शहरातील प्रत्येक नागरिक करणार आहे. 

Post a comment

0 Comments