विटा पालिका कर्मचाऱ्यासह चौघांना कोरोना, दिवसभरात १५ पाॅझिटीव्ह


विटा ,प्रतिनिधी 
     खानापूर तालुक्‍यात आज सकाळी सात तर दुपारी एक वाजेपर्यंत आणखी चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे रुग्णांची संख्या अकरा पर्यंत पोहोचली होती. तर आता चार वाजता आलेल्या अहवालानुसार तालुक्यात विटा नगरपालिकेच्या कदमवाडा परिसरातील वास्तव्यास असलेल्या एका कर्मचाऱ्यांसह नागेवाडी येथील आणखी तिघांचे असे एकूण चार जणांचे कोरणा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आज दिवसभरात खानापुर तालुक्यातील 15 जणांचा कोरणा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे ,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल लोखंडे.


Post a comment

0 Comments