Daily Mahasatta

Daily Mahasatta

मंत्री डाॅ. विश्वजीत कदम यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटीव्ह, कार्यकर्त्यांनी सोडला सुटकेचा निश्वास


कडेगाव ( सचिन मोहिते)
         बैठकीत एकत्रितपणे सहभागी झाल्यानंतर एका जवळच्या व्यक्तीचा कोरोना अहवाल पाॅझीटीव्ह आढळून आल्यानंतर कृषी राज्य मंत्री विश्वजीत कदम यांनी आपली कोरोना चाचणी करुन घेतली. या चाचणीचा अहवाल निगेटीव्ह असल्याची माहिती डाॅ. कदम यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.
           मंत्री विश्वजीत कदम यांनी म्हटले आहे, माझ्यासमवेत बैठकीत सहभागी झालेली एक जवळची व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल काल प्राप्त झाला. त्यामुळेच, मी तातडीने स्वतःचे विलगीकरण केले. खबरदारीचा उपाय म्हणून आज रविवारी मी कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रम, बैठकांमध्ये सहभागी झालो नाही. दरम्यान, मी काल कोरोना टेस्ट देखील केली. आज त्याचा अहवाल प्राप्त झाला असून माझी कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे.
        सर्व वैद्यकीय खबरदारी बाळगत मी माझ्या दैनंदिन कामकाजाला प्रारंभ करेन. काळजी नसावी, अशी पोस्ट मंत्री विश्वजीत कदम यांनी सोशल मीडियात केली आहे. दरम्यान आमदार मोहनराव कदम आणि कुटुंबातील सातजणांना कोरोना झाल्यामुळे धास्तावलेल्या डाॅ पतंगराव कदम गटाच्या समर्थकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

Post a Comment

0 Comments