Daily Mahasatta

Daily Mahasatta

' बार्टी ' कडून केलेले सर्वेक्षण बोगस : आर.पी.आय. चा आरोप


: फेरसर्वेक्षण करण्याची रिपब्लिकन पक्षाची मागणी

पलूस ( मोसीन वांगकर )
          सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्याकडून करण्यात येत असलेल्या सांगली जिल्ह्यातील अनुसूचित जाती मधील ५९ जातींचे सर्वेक्षण समतादूतांकडून चुकीच्या पद्धतीने करण्यात येत असल्याचा आरोप रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पलूस कडेगाव विधानसभा अध्यक्ष विशाल तिरमारे व तालुका उपाध्यक्ष शितल मोरे यांनी केला आहे.सदरच्या प्रकाराचे निवेदन पलूसचे नायब तहसीलदार राजेंद्र पाटील साहेब यांना देण्यात आले आहे.
           निवेदनात म्हंटले आहे की, अनुसूचित जाती मधील ५९ जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या जातीचे सर्वेक्षण बार्टीकडून सांगली जिल्ह्यातील ४१६ गावामध्ये करण्यात येत आहे. सदरचा सर्व्हे संमतांदुताकडून चुकीच्या पद्धतीने करण्यात येत आहे असे विविध संघटनांच्या निदर्शनास येते आहे. बार्टीकडून शासनाच्या पैशाचा चुकीचा वापर होत आहे. गावातील सरपंच, ग्रामसेवक यांच्याकडून सांख्यकी आकडे घेऊन सर्वे केल्याचे निदर्शनास येते आहे. 
          याप्रकारे करण्यात येणारे सर्वेक्षण थांबवावे व झालेले सर्व्हेक्षण पुन्हा करावे. समतादूतांबरोबर विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यामध्ये सहभागी करून घ्यावेत अशी आग्रही मागणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे. बार्टीकडून सर्व्हेक्षणामध्ये सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू असा इशारा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने विशाल तिरमारे यांनी दिला आहे. यावेळी विशाल तिरमारे,शितल मोरे,प्रसाद शिखरे,वैभव तिरमारे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments