Daily Mahasatta

Daily Mahasatta

अखेर कडेगाव तालुक्याला मिळाला खंबीर आणि कर्तव्यदक्ष अधिकारी


रिक्त असणारे गटशिक्षण अधिकारी झाले कायमस्वरूपी

कडेगाव ( सचिन मोहिते )
         गेली साडेतीन वर्ष कडेगाव तालुक्यात गटशिक्षण अधिकारी पद हे रिक्त होते. अतिरिक्त म्हणुन अनिस मुसा नायकवडी हे पदभार सांभाळत होते. परंतु काल त्यांनी आटपाडी येथुन बदली होऊन कडेगाव येथे कामावर रुजु होत पदभार स्वीकारला.
        त्यांनी सुरवातीला १२ वर्ष प्राथमिक शिक्षक म्हणुन काम केले आहे. त्यानंतर २०११ साली त्यांची गटशिक्षण अधिकारी म्हणुन निवड झाली. त्यानंतर सन २०११ ते २०१५ वडुज २०१५ ते २०१९ विटा विभाग व कडेगाव येथे अतिरिक्त म्हणुन व २०१९ ते २०२० आटपाडी येथे काम केले आहे. कालच आटपाडी येथुन कडेगाव येथे त्यांची बदली झाली आहे. 
        अनिस नायकवडी हे शिक्षण विभागात पूर्वीपासुन जरब व कार्यतत्पर असे अधिकारी म्हणुन त्यांची ओळख आहे. कोणत्याहि गावातुन फोन आला कि साहेब इथे अडचण निर्माण झाली आहे त्याच क्षणी त्या ठिकाणी धाव घेऊन निर्माण झालेली अडचण अगदी हुशारिने दूर करतात. म्हणुनच त्यांना कार्यतत्पर आणि खमक्या अधिकारी म्हणुन ओळखले जाते. इथुन पुढील काळात शिक्षण विभागात कडेगाव तालुका अव्वल स्थानी नेण्याचा पूरेपूर प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगीतले .

Post a Comment

0 Comments