Daily Mahasatta

Daily Mahasatta

युवा नेते जितेश कदम कोरोना पाॅझीटीव्ह


सांगली (राजेंद्र काळे)
         राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम यांचे नातू आणि आणि राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे पुतणे जितेश हणमंत कदम यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव आला आहे.
         याबाबत स्वतः जितेश कदम यांनी सोशल मीडियात ही माहिती शेअर केली आहे. " आज मला कोरोनाची सौम्य लक्षणे दिसत असल्यामुळे कोव्हिड १९ चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल पाॅझीटीव्ह  आला आहे. कोरोना टाळण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न केले पण बर्‍याच विषयांवर लोकं मला भेटत असतात. सध्या माझी प्रकृती ठीक असून डॉक्टरांनी मला रुग्णालयात राहण्यास सांगितले आहे. मी सर्वांना नम्रपणे विनंती करतो की, माझ्या संपर्कातील सर्व लोकांनी त्यांची कोरोना टेस्ट करुन घ्यावी. जवळच्या लोकांनी क्वारंटाईनमध्ये जावे.
काळजी घ्या.. सुरक्षित राहा...असे जितेश कदम यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. युवा नेते जितेश लवकरात लवकर बरे व्हावे, अशी प्रार्थना हजारो कार्यकर्ते सोशल मीडियाच्या माध्यमातून करत आहेत.

Post a Comment

0 Comments