इस्लामपुरात दुध एल्गार आंदोलनइस्लामपूर ( हैबत पाटील )
             इस्लामपुर विधानसभा मतदार संघात उरूण - इस्लामपुर नगरपरीषदेचे नगराध्यक्ष व भाजपाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील (दादा) यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी शेतकर्‍यांच्या दुधाला अनुदान व दरवाढ मिळावी म्हणुन मतदार संघात अनेक ठिकाणी आंदोलन करून महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
            कोरोना च्या संकटात शेतकरी वर्ग अर्थिक अडचणीत सापडला असुन शेतकर्‍यांच्या गाई च्या दुधाला प्रति लिटर १० रुपये अनुदान मिळावे,दुध भुकटी ला ५० रुपये अनुदान मिळावे, गाई च्या दुध खरेदीचा दर ३० रुपये करावा या मागणीसाठी इस्लामपुर विधानसभा मतदार संघातील वाळवा फाटा,कोरेगांव,लक्ष्मी फाटा,इस्लामपुर या ठिकाणी दुध वहातुकीची वहाने आडवुन आंदोलन केले तर मतदार संघातील सर्व गावांमध्ये दुध संकलन बंद ठेवुन दुध उत्पादक शेतकर्‍यांना बरोबर घेऊन दुध संकलन केंद्रावर आंदोलन करण्यात आले या आंदोलनामुळे शेतकरी वर्गातुन समाधान व्यक्त होत असुन अनेक शेतकर्‍यांनी राज्य सरकारने याबाबत तात्काळ निर्णय घेऊन न्याय द्यावा अशी मागणी केली.
           यावेळी वाळवा तालुका भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष प्रसाद पाटील (दादा),जेष्ठ नेते मधुकर हुबाले,वाळवा तालुका भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील,भाजपा इस्लामपुर शहर अध्यक्ष अशोक खोत,संजय हवलदार,प्रविण परीट,अक्षय कोळेकर,भाजपाचे संघटन सरचिटणीस संदीप सावंत,गजानन पाटील,भाजपा  युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रविण माने,आष्टा भाजपा शहर अध्यक्ष संदीप गायकवाड,यदुराज थोरात,अक्षय पाटील,अनिल सरदेशमुख,प्रमोद डांगे,शितल चौगुले,विजय शिंदे,विश्वजीत पाटील, रणजीत माने,सचिन जगदाळे,विक्रम शिंदे,दिलीप कुंभार,वाहिद मुजावर,शुभम पाटील,आनंदराव पाटील,संदीप चव्हाण,संदीप कोकरे,बंडा आडमुटे, आदिसह अन्य पदाधिकारी,कार्यकर्ते,दुधउत्पादक शेतकरी यांनी या आंदोलनात सहभाग घेतला.

Post a comment

0 Comments