Daily Mahasatta

Daily Mahasatta

मंत्री विश्वजीत कदम यांनी नेदरलँडहून आणलेल्या अत्याधुनिक बोटीमुळे पूरग्रस्त भागाला दिलासा


: पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते बोटींचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी कृषी राज्य मंत्री विश्वजीत कदम उपस्थित होते. 

पलूस ( मोसीन वांगकर)
        गतवर्षीच्या पुरामध्ये ब्रम्हनाळ येथे घडलेल्या बोट दुर्घटनेमुळे सतरा ग्रामस्थांना प्राण गमवावा लागला होता. त्यानंतर कडेगाव मतदारसंघातील ग्रामस्थांनी कै. पतंगराव कदम आपत्कालीन निधी जमा केला होता. या निधीतून नेदरलँड होऊन कमी वजनाच्या अत्याधुनिक आठ बोटी मागवण्यात आले आहेत. या लग्न गोष्टीमुळे पूरग्रस्त भागाला मोठा दिलासा मिळाला आहे
         या बोटींचे लोकार्पण आज औदुंबर तालुका पलूस येथे पालक मंत्री जयंतराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कृषी व सहकार राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदम, आमदार मानसिंगराव नाईक, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा पोलीस प्रमुख सुहैल शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांची प्रमुख उपस्थिती होती.
         पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून विविध उपाय योजना केल्या जात आहेत. अचानक मोठ्याप्रमाणावर पाऊस झाला तर निर्माण होणाऱी परिस्थीती नियंत्रीत ठेवण्यासाठी व धरणक्षेत्रामध्ये पडणारा पाऊस यांचे साधारण प्रमाण लक्षात घेवून पुर्ण तयारीने धरणातून विसर्ग सुरु केला आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीमध्ये वाढ होत आहे. जलसंपदा विभागाने कर्नाटक सरकारशी सातत्याने संपर्कात राहून अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्याबाबत विनंती केली आहे. त्यानुसार कर्नाटक सरकारकडून 2 लाख 20 ते 2 लाख 50 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु करण्याचे मान्य केले आहे. येत्या काही दिवसांमध्ये मोठा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे मर्यादा सोडून जर फार मोठा पाऊस आला तरच पुरपरिस्थती निर्माण होण्याची शक्यता आहे. तथापि, सर्व धरणांमध्ये अतिशय नियोजनबध्द साठा ठेवण्यात आला असल्याने तशी परिस्थिती निर्माण होणार नाही अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
            कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम म्हणाले, गेल्यावर्षी कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यामध्ये महापुर आला त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे, शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले, घरांची पडझड झाली. त्यामुळे यावर्षी शासनाकडून तसेच पालकमंत्र्यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती, जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक गावांना बोटी देण्याचे काम सुरु आहे. गतवर्षी पलूस तालुक्यालाही पुराचा मोठा फटका बसला होता. ब्रम्हनाळ सारखी दुर्घटना घडली त्यामुळे कै. पतंगराव कदम यांच्या नावाने आपतकालीन निधी गोळा करण्याचे काम सुरु करण्यात आले होते. या निधीमध्ये अनेक लोकांनी मदत केली. या निधीच्या माध्यमातून नेदरलँडहून 8 बोटी सांगली जिल्ह्यासाठी मागविण्यात आहेत. त्यातील 6 बोटी या पलूस तालुक्यातील पुरग्रस्त गावांच्या सेवेसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. उर्वरित 2 बोटी सांगली शहर व जिल्ह्यातील इतर पुरग्रस्त भागासाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. या बोटी अतिशय उच्च दर्जाच्या ,अतिशय वेगवान, कमी वजनाच्या परंतु अतिशय टनक असून त्यातून एका वेळेला 18 ते 20 लोकांच्या क्षमतेच्या असून जलदगतीने लोकांना बाहेर काढण्यासाठी याचा उपयोग होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
000000

Post a Comment

0 Comments