Daily Mahasatta

Daily Mahasatta

कुपवाडात रॅपिड अँटिजन टेस्ट मध्ये चार पॉझिटिव्ह
   कुपवाड, ( प्रमोद अथणीकर)
          कुपवाड मधील खारे मळा परिसरात काल शुक्रवारी  रॅपिड अँटिजन टेस्ट घेण्यात आल्या. यामध्ये तीन महिला व एक  पुरुष असे चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
      कुपवाड मध्ये प्रभाग क्र 8 मध्ये काल रॅपिड अँटिजन टेस्ट घेण्यात आली. यावेळी त्या भागातील एकूण पन्नास नागरिकांचे टेस्ट केली असता यामध्ये तीन महिला व एक पुरूष असे एकूण चार नागरिकाचा अहवाल पँझिटिव्ह आला असून प्रभाग क्र 8 च्या नगरसेविका कल्पना कोळेकर व सामाजिक कार्यकर्ते महेश निर्मळे यांनी कंटेन्मेंट झोनमध्ये सॅनिटायझर फवारणी करून घेतली व त्याना यापुढील उपचारासाठी कोविड सेंटरला पाठवून दिले आहे.

Post a Comment

0 Comments