विट्यात एक्स-रे टेक्निशियनसह, पाटील वस्ती, कदमवाड्यात 8 जण पाॅझीटीव्ह


सांगली (राजेंद्र काळे)
        आज विटा शहरातील एका मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल मधील एक्स-रे टेक्निशियनसह खानापूर रोड पाटील वस्ती येथील ४ कदम वाड्यातील २ आणि मूळचा भेंडवडे येथील मात्र सद्या विटा शहरात वास्तव्यास असलेल्या एका युवकाचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझीटीव्ह आला आहे.
        विटा शहरातील मायणी रस्त्यावरील एका मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल मधील एका डॉक्टर सह जणांचे 11 कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर आता या हॉस्पिटल मधील एका एक्स-रे टेक्निशियनचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. हा एक्स-रे टेक्निशियन नेवरी रोड येथील भवानी माळ, चेंबर एरिया परिसरातील रहिवासी आहे.
तसेच खानापूर रस्त्यावरील औद्योगिक वसाहतींमध्ये राहणाऱ्या एकाच कुटुंबातील आणखी चौघांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 60 वर्षीय स्त्री, 34 वर्षांची स्त्री, 35 वर्ष पुरुष 8 वर्षाचा मुलगा यांचा समावेश आहे तसेच कदम वाडा येथील नगर परिषदेतील एका अधिकाऱ्याच्या मुलगा आणि सुनेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे दुपारपर्यंत विटा शहरातील आठ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.


Post a comment

0 Comments