Daily Mahasatta

Daily Mahasatta

कासेगावात 7 पोलिसांना कोरोनाची लागण


इस्लामपूर ( हैबत पाटील)
          कासेगाव पोलीस ठाण्यात सात पोलिसांना कोरोची लागण झाली असल्याचा तपासणी अहवाल आला आहे . कासेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ याना कोरोनाच्या लागण झाली होती
           आज सात पोलिस कर्मचाऱ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांच्यावर येथील कोव्हीड केअर सेंटरमध्ये उपचार करण्यात येणार आहेत, अशी माहिती सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ.राणोजी शिंदे यांनी दिली. वाघ हे रोज सकाळी मित्रांच्यासमवेत सायकलिंग व व्यायामासाठी जात असतात. शिवाय महामार्गावरील बंदोबस्त, गणेश मंडळांच्या बैठका सुरु असल्याने त्यांच्याशी संपर्क आलेल्यांची संख्या मोठी आहे.
            सोमवारी रात्री वाघ यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर इस्लामपूर येथील कोव्हीड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. पोलिस ठाण्यातील त्यांच्या संपर्कातील पोलिस कर्मचाऱ्यांना होम कोरंटाइन करण्यात आले होते. त्यांचे स्वब तपासणी घेण्यात आले होते.

Post a Comment

0 Comments