आमदारांसह कुटुंबातील 7 जण कोरोना पॉझिटिव्ह


सांगली, प्रतिनिधी
            सांगली जिल्ह्यातील मिरज विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि माजी मंत्री सुरेशभाऊ खाडे यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून त्याच्या कुटुंबातील आणखी सात जणांचा कोरोना चाचणी अहवाल देखील पॉझिटिव आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
            भारतीय जनता पक्षाचे मिरज विधानसभा क्षेत्रातील मतदारसंघातील विद्यमान आमदार आणि माजी सामाजिक न्याय मंत्री सुरेश भाऊ खाडे यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील लोकांची कोरोना चाचणी केली असता यापैकी पत्नी, दोन सुनासह कुटुंबातील सात जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच आमदार खाडे यांच्या संपर्कात आलेल्या अन्य 16 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. यापैकी आठ लोकांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आमदार सुरेश खाडे आणि त्यांच्या पत्नी यांच्यावर मिरजेतील एका मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत.

Post a comment

0 Comments