Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली जिल्हा कारागृहात 63 कैदी पाॅझीटीव्ह


सांगली, प्रतिनिधी
.जिल्हा जिल्हा कारागृहात तीन दिवसांपूर्वी ९२ कैद्यांची कोरोना तपासणी करण्यात आला होती. त्यापैकी तब्बल ६३ कैद्यांचा रिपोर्ट हा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. ज्यामुळे कारागृह प्रशासन हादरून गेले आहे.
रविवारी रात्री याबाबत उशिरा अहवाल प्राप्त झाले. एकाच वेळी कारागृहातील तब्बल ६३ बंदिवानांचा रिपोर्ट हा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. ज्यामुळे कारागृह प्रशासन हादरून गेले आहे.
अहवाल येताच जिल्हा आणि कारागृह प्रशासनाने तातडीने खबरदारीच्या उपयोजना सुरू केल्या आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या कैद्यांना कारागृहात क्वारंटाइन केले आहे. ५० वर्षाच्या वरील कैद्यांचे तात्पुरते अलगीकरण करण्यात आले असून त्यांना अन्यत्र हलवण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे टेस्ट झालेला एक कैदी हा नुकताच जामीनावावर सुटला असून त्याचा अहवाल सुद्धा पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली असून त्या कैद्याचा शोध सुरू करण्यात आला आहे. 

Post a Comment

0 Comments