विट्यातील लॅब टेक्निशियनसह 5 जण पॉझिटिव्ह

विटा प्रतिनिधी 
         विटा शहरातील एका खासगी लॅब टेक्निशियनसह विटा शहरातील अन्य दोन तसेच तालुक्यातील दोन असे एकूण पाच जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
         याबाबत अधिक माहिती अशी, विटा येथील एका खासगी लॅबमधील टेक्निशियन 60 वर्षे पुरुष तसेच विटा शहरातील 51 वर्षाचा पुरुष आणि भवानीनगर येथील 75 वर्षाचा पुरुष यांचे अहवाल पाॅझीटीव्ह आले आहेत. तसेच साळशिंगे येथील 74 वर्षांचा पुरुष आणि खानापूर येथील 58 वर्षाची महिला यांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यातील विटा येथील रुग्ण विटा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत तर अन्य साळशिंग येथील रुग्ण सेवा सदन हॉस्पिटल मिरज येथे उपचार घेत आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर आणि लोखंडे यांनी दिली आहे

Post a comment

0 Comments