Daily Mahasatta

Daily Mahasatta

पत्रकारांना 50 लाखाचे विमा संरक्षण द्यावे


शिराळा : तालुका पत्रकार संघाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देताना अध्यक्ष विजय पाटील, कार्याध्यक्ष सुमंत महाजन, कोषाध्यक्ष रविंद्र कदम आदी.

मांगले (राजेंद्र दिवाण) 
        कोरोनाच्या विश्व महामारीच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून कठीण प्रसंगाना तोंड देत ग्रामीण व शहरी सर्वच पत्रकारांनी समाजासाठी महत्वपूर्ण काम केले आहे. तरी पत्रकारांना सुद्धा शासनाने कारोना योद्धा मानुन 50 लाख रूपयांचा विमा उतरवावा. त्याचबरोबर पत्रकारांच्या हितासाठी संपूर्ण देशात एकाच प्रकारचा विमा असावा प्रत्येक राज्याचा तो वेगवेगळा आहे. तो एक समान लागु करावा आदी विविध मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ सलग्न शिराळा तालुका पत्रकार संघाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे पाठविण्यात आले.
      या निवेदनाची एक प्रत तहसिलदार गणेश शिंदे यांना दिली असल्याची माहिती अध्यक्ष विजय पाटील यांनी दिली. या निवेदनातम्हंटले आहे, कोरोना महामारीच्या काळात कठीण परिस्थितीत समाजाला जागृत करण्याचे महत्वपूर्ण काम पत्रकारांनी केले आहे. काम या काळात काही पत्रकारांच्यावर हल्ले झाले.आपली जबाबदारी पार पाडत असताना कोरोना संक्रमाणांच्या धोक्यात सुद्धा सामोरे जावे लागले.परंतु पत्रकारांना कोरोना योद्धा मानले नाही.अडचणीच्या काळातही शासनाकडून पत्रकारांना कोणत्याही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत. शासनाने कोरोना योद्धा म्हणून सन्मान द्यावा.
        गेली सहा महिन्यापासून कोरोना महामारीच्या काळात विविध वृत्तपत्रात काम करणा-या पत्रकारांना व त्यांच्या कुटुंबीयांना अन्य लोकांकडून मदत घ्यावी लागली. परंतु शासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही. तरी आमची आग्रहाची मागणी आहे की जिल्हा व तालुका पातळीवरील लहान व मोठ्या पत्रकारांची सरसकट यादी तयार करून त्यांना प्रतिमहा 10 हजार रूपये द्यावेत व आमच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा. पत्रकारांना न्याय द्यावा, अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ सलग्न शिराळा तालुका पत्रकार संघाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महामहीम राज्यपाल, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पालक मंत्री जयंत पाटील, आमदार मानसिंगराव नाईक यांचेकडे पाठविण्याकरिता तहसिलदार गणेश शिंदे यांना दिले.या निवेदनावर अध्यक्ष विजय पाटील, कार्याध्यक्ष सुमंत महाजन, कोषाध्यक्ष रविंद्र कदम, सचिव भगवान शेवडे, उपाध्यक्ष प्रकाश मोहरेकर आदीसह पदाधिका-यांच्या सह्या आहेत.
------------------------------------------------

Post a Comment

0 Comments