Daily Mahasatta

Daily Mahasatta

विटयातील डॉक्टरसह 5 रुग्ण कोरोना पाॅझीटीव्ह


सांगली ( राजेंद्र काळे )
       विटा येथील एका मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल मधील डॉक्टरांसह तालुक्यातील अन्य चार जण असे एकूण पाच जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी  विश्वसनीय माहिती आहे. 
        विटा शहर आणि तालुक्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. आज पुन्हा एकदा शुक्रवार ता. 7 रोजी पाच जणांचा कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आला आहे यामध्ये विट्यातील एका मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल मधील डॉक्टर तसेच नागेवाडी येथील पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या डॉक्टरांची 45 वर्षाची पत्नी आणि 19 वर्षाचा मुलगा तसेच भाळवणी येथील 55 वर्षाचा पुरुष आणि वेजेगाव येथील 20 वर्षाचा मुलगा असे आज विटा शहरासह 5 जणांचे कोरोना अहवाल पाॅझीटीव्ह आले आहेत.

Post a Comment

0 Comments