Daily Mahasatta

Daily Mahasatta

महापुराचे संकट दारात ; सांगलीत 3 हजार नागरिकांच्या स्थलांतरासाठी प्रशासन सज्ज


 : जामवाडी, सूर्यवंशी प्लॉटची आयुक्त कापडणीस यांनी केली पाहणी
: 3 हजार नागरिकांच्या तात्पुरत्या निवाऱ्याची सोय
: 29 फुटाची पातळी होताच नागरिकांनी स्थलांतर करावे

मिरज ( किरण पाटील)
          कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्याने सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने महापालिका प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजनांना सुरवात केली आहे. कृष्णा नदीला होणारी 37 फुटाची संभाव्य पाणीपातळी गृहीत धरत मनपाकडून ज्या भागात पाणी येण्यास सुरुवात होते , त्या भागातील लोकांना सुरक्षित स्थळी निघण्याच्या सूचना देण्यात येत आहेत.
           या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी जामवाडी ,सूर्यवंशी प्लॉटची पाहणी करत नागरिकांना स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच 3 हजार नागरिकांच्या तात्पुरत्या निवाऱ्याची सोय महापालिकेकडून वेगवेगळ्या महाविद्यालयात करण्यात आली असल्याचे मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी सांगितले. कृष्णा नदीमध्ये 29 फुटाची पातळी होताच नागरिकांनी खबरदारी म्हणून स्वताहून स्थलांतरित व्हावे आणी प्रशासनाकडून ज्या ठिकाणी तात्पुरत्या निवाऱ्याची सोय केली आहे, अशा ठिकाणी जावे असे आवाहन करण्यात येत आहे.
          तसेच जे लोक पाणी वाढूनही बाहेर पडणार नाहीत अशी घरे महापालिका प्रशासन पोलिसांच्या मदतीने सक्तीने सील करणार असल्याचा इशाराही मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिला आहे. आपले नुकसान टाळण्यासाठी नागरिकांनी वेळीच स्थलांतरित व्हावे असे आवाहनही आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे. यावेळी अग्निशामक अधिकारी चिंतामणी कांबळे, सहायक आयुक्त सहदेव कावडे, स्वच्छता निरीक्षक धनंजय कांबळे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments