Daily Mahasatta

Daily Mahasatta

पेठ गावात 2 सप्टेंबर पासून लाॅकडाऊन...


पेठ ( रियाज मुल्ला)
          पेठ ता.वाळवा येथे कोरोनाचा वाढता प्रसार पाहता गर्दी रोखण्यासाठी बुधवार दि.2 ते 7 सप्टेंबर अखेर पेठ गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय कोरोना दक्षता समिती च्या बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष शंकर पाटील यांनी दिली.
         पेठ  गावात गेल्या चार  दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून आज अखेर रुग्णसंख्या  17 झाली आहे.रोज रुग्ण संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे गावातील नागरिकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कोरोनाची साखळी तोडण्याच्या दृष्टिकोनातून सर्व व्यवहार बंद ठेऊन 100 टक्के लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून जनता कर्फ्यु चे आवाहन करण्यात आले आहे.
              यावेळी मा. जि. प. सदस्य सम्राटबाबा महाडिक, बांधकाम समिती सभापती जगन्नाथ माळी, उपसरपंच दीपक कदम , एम. डी. चव्हाण,विकास दाभोळे,अमीर ढगे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

Post a Comment

0 Comments