Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली महापालिका उभारणार 200 बेडचे कोव्हीड हॉस्पिटल


: मदतीसाठी आयुक्तांचे दानशुराना आवाहन
: आमदार, महापौर आणि आयुक्तांकडून पाहणी
: कोल्हापूर रोडवरील आदिसागर हॉल कोविड हॉस्पिटलसाठी निश्चित


सांगली, प्रतिनिधी
        सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून 200 बेडचे कोव्हीड हॉस्पिटल तयार होत आहे. यासाठी कोल्हापूर रोडवरील आदीसागर कार्यालयाची जागा मनपा पदाधिकारी यांच्या समवेत पाहणी करून निश्चित करण्यात आली असल्याची माहिती मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली. याचबरोबर या कोविड हॉस्पिटलसाठी दानशुरानी वस्तू स्वरूपात मदत करावी असे आवाहनाही आयुक्त कापडणीस यांनी केले आहे.
           सांगली महापालिकेकडून 200 बेडचे कोरोना हाॅस्पीटल सुरू केले जाणार आहे. यासाठी गेल्या काही दिवसांपासून जागेचा शोध सुरू होता. आज आमदार सुधीरदादा गाडगीळ, महापौर गीताताई सुतार आणि मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी आपल्या मनपा पदाधिकारी आणि अधिकाऱ्यां समवेत अनेक जागांची पाहणी केली. या पाहणीत कोल्हापूर रोडवरील फळमार्केटसमोरील आदीसागर मंगल कार्यालयाची प्रशस्त जागा सर्वानुमते निश्चित करण्यात आली आहे. या ठिकाणी मनपाकडून ऊद्यापासून 200 बेडचे कोव्हीड हॉस्पिटलचे काम सुरु होणार आहे. आदीसागर हॉलची जागा निश्चित केल्यामुळे आता मनपाचे 200 बेडचे कोविड हॉस्पिटल उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
            या पहाणीवेळी उपमहापौर आनंदा देवमाने, गटनेते युवराज बावडेकर, महिला बालकल्याण सभापती नसीमा नाईक, प्रभाग सभापती उर्मिला बेलवलकर, नगरसेविका स्वाती शिंदे, नगरसेवक संजय यमगर, विष्णू माने ,शहर अभियंता आप्पा अलकुडे, उपअभियंता ऋतुराज यादव आदी उपस्थित होते. सर्वानुमते आदीसागर हॉलची जागा कोविड हॉस्पिटल साठी निश्चित करण्यात आली असून हे हॉस्पिटल सुरू करण्यासाठी मोठा खर्चही अपेक्षित असल्याने दानशूर लोकांनी वस्तुरूपी मदत देण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि या कोविड हॉस्पिटलला साहित्यरूपी मदत देऊन सहकार्य करावे असे आवाहन मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments