कहर...सांगली मनपा क्षेत्रात ८९ पॉझिटीव्ह
सांगली, प्रतिनिधी      सांगली महापालिका क्षेत्रात रुग्ण वाढीचा आकडा दररोज नवनवीन उच्चांक गाठत आहे. आज एका दिवसात सांगली महापालिका क्षेत्रात 89 रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये सांगलीतील इंदिरानगर झोपडपट्टीतील 23 जणांचा समावेश आहे .या 23 जणांची महापालिकेच्यावतीने अँटिजेंन टेस्ट घेण्यात आली होती.     आज सांगली मिरज आणि कुपवाड क्षेत्रात दिवसभरात 381 जणांची  रॅपिड अँटिजेंन टेस्ट घेण्यात आली. यामध्ये  मनपा क्षेत्रातील एकूण 51 रुग्णाचे अहवाल  पॉझिटिव्ह आले आहेत. झोपडपट्टीत एकाच वेळी इतक्या प्रमाणात रुग्ण आढळल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.        महापालिकेने सुरू केलेल्या रॅपिड अँटिजेंन टेस्टमध्ये सांगली मनपाक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह व्यक्ती सापडत आहेत. आज सांगलीच्या इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये 23 व्यक्तींचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळं हा संपूर्ण इंदिरानगर केले जाणार परिसरच कंटेन्मेंट झोन केला जात असून या ठिकानी असणाऱ्या नागरिकांना याच ठिकाणी कोरंटाईन केले जाणार आहे. अजूनही या परिसरात रॅपिड अँटिजेंन टेस्ट सुरू असून महापालिकेकडून खबरदारीच्या उपाययोजना सुरवात केली आहे. आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार या परिसरात तातडीने औषध फवारनीसह वैद्यकीय सर्व्हे वाढण्यात आला आहे. याचबरोबर उपायुक्त स्मृती पाटील, स्थानिक नगरसेवक बाळासाहेब सावंत, सहायक आयुक्त एस एस खरात, स्वच्छता निरीक्षक बंडा जोशी, याकूब मद्रासी , अतुल आठवले यांच्या टीमकडून तातडीच्या उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. शीतल धनवडे यांच्या वैद्यकीय पथकाकडून नागरिकांची रॅपिड अँटिजेंन टेस्ट घेणेचे काम सुरू असून कंटेन्मेंटच्या अंमलबजावणीला सुरवात झाली आहे.         दरम्यान रॅपिड अँटिजेंन टेस्टसह नियमित चाचणी मधून आज सांगली मिरज कुपवाड या महापालिका क्षेत्रात आज सायंकाळ पर्यंत 89 रुग्ण कोरोना पाॅझीटीव्ह आढळून आल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

Post a comment

0 Comments