Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

नवकृष्णा व्हॅली स्कूलचा रुद्र बियाणी जिल्ह्यात प्रथम


: 10 वी CBSE परिक्षेचा निकाल
: 100 टक्के यशाची परंपरा कायम

कुपवाड, प्रतिनिधी
           :  नव कृष्णा व्हॅली स्कूल इंग्रजी माध्यमाच्या CBSE विभागाने 10 वी च्या 100% निकालाची परंपरा अखंडीत ठेवली आहे. शाळेचा विद्यार्थी कु. रूद्र सचिन बियाणी याने 97.4% गुण मिळवत सांगली  जिल्ह्यात प्रथमक्रमांक पटकावला. कु. चिन्मय वैभव बसरावत याने 94.4% मिळवून द्वितीय  तर 93.4% गुण प्राप्त करून कु.मक्ता मनिष रेडिज हिने तृतीय क्रमांक मिळविला.  तसेच कु.अर्चना सदाशिव खांडेकर हिने 88%गुण  मिळवत चतुर्थ क्रमांक मिळाला.
        नव कृष्णा व्हॅली स्कूल 1994 पासून अखंडपणे आपल्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा ठसा उमटवत आहे. शाळेच्या या घवघवीत यशा मध्ये शाळेच्या शिक्षक वृंद व त्यांनी केलेले अथक परिश्रम यांचे मोलाचे योगदान आहे.विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ब्रीद डोळ्यासमोर ठेवून शाळा उत्तरोत्तर प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे.
        विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रविणशेठ लुंकड,सचिव एन.जी.कामत सर यांनी  विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.इंग्रजी माध्यमाच्या प्राचार्या सौ.संगीता पागनीस, उपप्राचार्य प्रशांत चव्हाण व  सर्व शिक्षक स्टाप यांचे  मार्गदर्शन लाभले.

Post a comment

0 Comments