Daily Mahasatta

Daily Mahasatta

मणदुर पॅटर्न राज्यभरात राबविणे गरजेचे - खासदार धैर्यशील मानेचांदोली( नथुराम कुंभार )
मणदुर येथील ग्रामस्थ व आरोग्य विभाग, प्रशासनाच्या समन्वयामुळे कोरोणाचा हाॅटस्पाॅट ठरलेले शिराळा तालुक्यातील मणदुर गाव कोरोनामुक्त करण्यात यश आले आहे. मणदुर गावचा आदर्श घेवुन मणदुर पॅटर्न राज्यभरात राबविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन खासदार धैर्यशील माने यांनी केले.
मणदुर(ता.शिराळा)येथे कोरोनासंदर्भात येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेण्यात आलेल्या अढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी तहसिलदार गणेश शिंदे,गट विकास अधिकारी अनिल बागल, जि. प. सदस्य- संपतराव देशमुख, माजी सभापती हणमंतराव पाटील उपस्थीत होते. 
 खासदार माने म्हणाले,मणदुर गावमध्ये कोरोणाचा शिरकाव झाल्यानंतर तो वाढु नये. यासाठी प्रशासनाच्यावतीने हे गाव लाॅकडाऊन करण्यात आले होते. लाॅकडाऊनच्या कालावधीत कोरोणाची साखळी तोडण्यासाठी पोलीस प्रशासन,आरोग्य विभाग,गावातील आशा स्वयंसेविका,अंगणवाडी सेविका, मदतनीस, स्वयंसेवक व ग्रामपंचायतीने काटेकोर अंमलबजावणी केली.ग्रामस्थांनी ही त्यांना चांगले सहकार्य केले.
त्यामुळे मणदुर हे गाव कोरोणामुक्त करण्यात यश आले असुन,सर्वांचे काम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगीतले.यापुढे ही सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी तसेच गावामध्ये एक गाव एक गणपती उपक्रम राबवावा असे अवाहन ही त्यांनी यावेळी केले. दरम्यान यावेळी मंडल अधिकारी पी.बी. जाधव,तलाठी भास्कर पाटील,ग्रामसेवक एम.एन.पाटील,सरपंच,उपसरपंच व ग्रामस्थ उपस्थीत होते.

Post a Comment

0 Comments