Daily Mahasatta

Daily Mahasatta

इस्लामपुरातील अट्टल चोरट्यांची टोळी जेरबंद
इस्लामपूर प्रतिनिधी

         : पुणे-बेंगलोर महामार्गावरील कासेगाव येथील दत्त भवन जवळ बंद पडलेल्या मालवाहू ट्रक मधील काच फोडून क्लीनरला मारहाण करत रोकड लांबवणार्या इस्लामपूरातील अटल चोरट्यांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे
          या टोळीमध्ये कुख्यात गुंड रवी महावीर खोत (वय 29 )रा.अजिंक्य नगर मदिना कॉलनी जवळ, इस्लामपूर याच्यासह संदीप शिवाजी कुंटे (वय 21) रा. लोणार गल्ली इस्लामपूर, ऋतिक दिनकर महापुरे (वय 29 )रा.खंबाळे मळा इस्लामपूर आणि जयेश रवींद्र पवार (वय-25) इंदिरा कॉलनी इस्लामपूर अशी टोळीतील सदस्यांची नावे आहेत.
           इस्लामपुरातील रवि खोत याच्यावर कवठेमंकाळ पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा तसेच इस्लामपूर पोलीस ठाण्यात खुनाचे दोन गुन्हे दाखल आहेत. काही दिवसापूर्वी रवि खोत याने अन्य तीन साथीदारांसह कासेगाव येथील बंद पडलेल्या ट्रक चा काच फोडून क्लीनरला खुरप्याचा  धाक दाखवून रोकड लंपास केली होती. या घटनेचा तपास करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले आहे. आज पेट नाका येथे रवी खोत हा टोळीतील अन्य साथीदारांसह  उभा असल्याचे खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर छापा टाकून पोलिसांनी या टोळीला जेरबंद केले. चोरी प्रकरणातील रोख रक्कम सात हजार रुपये व त्यांच्या गुन्ह्यात वापरलेली स्प्लेंडर गाडी आणि खुरपे असा सुमारे 47 हजार रुपयांचा मुद्देमाल पंचनामा करून पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अंतर खाडे ,प्रवीण शिंदे, मारुती साळुंखे, सुनील चौधरी, संकेत कानडे, मच्छिंद्र बर्डे, गजानन गस्ते, कुबेर खोत यांच्या पथकाने केली

Post a Comment

0 Comments