Daily Mahasatta

Daily Mahasatta

आज १३९ पाॅझीटीव्ह : तर ८ जणांचा मृत्यूजिल्ह्यातील १३९ पाॅझीटीव्ह पैकी महापालिका क्षेत्रात ११६ तर ग्रामीण भागात केवळ २३

सांगली ता. २८ प्रतिनिधी
         सांगली जिल्ह्यात आज १३९ रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल  पॉझिटिव्ह आले असून जिल्ह्यातील  रुग्णांची एकूण संख्या १८९८ इतकी झाली आहे तर आज दिवसभरात ८ जणांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे
         सांगली जिल्ह्यात २२ तारखेपासून लाॅकडाऊनला सुरुवात झाली. मात्र या कालावधीत प्रत्येक दिवशी शंभरपेक्षा अधिक रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत.  त्यामुळे चिंतेचे वातावरण आहे.आज दिवसभरात १३९ रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये सांगली महापालिका क्षेत्रातील सर्वाधिक ११६ रुग्णांचा समावेश आहे.यामध्ये सांगली शहरातील ६२ तर मिरज शहरातील ५४ रुग्णांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे आटपाडी तालुका-४ जत-१ कवठेमंकाळ-४ कडेगाव-२ मिरज तालुका -4 पलूस-१ वाळवा -६तासगाव-१ शिराळा -१ असे जिल्ह्यात एकूण १३९ रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. विशेष म्हणजे या १३९ रुग्णामध्ये महापालिका क्षेत्रातील ११६ तर संपूर्ण जिल्ह्यात अवघे २३ रुग्ण आहेत. त्यामुळे आजअखेर  महापालिका क्षेत्रातील ९६२ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत.
       आज मंगळवारी दिवसभरात मिरज शहरातील ५ कवठेमंकाळ -१ आणि पलूस १ तर  कोल्हापूर  दतवाड गावचा एक असा आठ जणांचा  आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर आज २७ रुग्णानी कोरोना वर मात केली आहे.


Post a Comment

0 Comments