Daily Mahasatta

Daily Mahasatta

ऑपरेटरच्या खूनप्रकरणी मिरजेतील चारजण जेरबंद: लहान मुलीशी अश्लील चाळे
: जेसीबी ऑपरेटरचा खून
: मिरज तालुक्यातील चौघांना अटक

मिरज ( इश्वर हुलवान )
       कामाच्या ठिकाणी  लहान मुलीशी अश्लील  चाळे केल्याच्या संशयावरून जेसीबी ऑपरेटरचा खून केल्याप्रकरणी  मिरज तालुक्यातील  चौघाजणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने बेड्या ठोकले आहेत.
          याप्रकरणी अटक केलेल्यांची नावे अशी, शब्बीर असलम शेख (वय- 30 रा. चिंतामणी नगर मंगल कार्यालयासमोर बुधगाव, ता. मिरज),  अनिकेत सुरेश पाटील (वय-23 रा.कर्नाळ रोड, बुधगाव ता. मिरज)  गणेश शहाजी पाटील (वय- 25 रा. बुधगाव ) आणि विशाल धोंडीराम माने (वय 28 वर्षे रा. बिसूर तालुका मिरज) या चौघांना अटक करण्यात आली आहे.
         याबाबत अधिक माहिती अशी मयत कुंदन कुमार भोला उरवे (मुळ रा. बिहार)   हा यातील फिर्यादी अनिल नलावडे, (कवलापूर) यांच्या जेसीबी मशीन वरती दीड वर्षापासून ऑपरेटर म्हणून काम करत होता. काल सोमवार  27 रोजी त्याचे कामाच्या ठिकाणी  त्याने जवळच असलेल्या एका लहान मुलीशी अश्लील चाळे केले. याबाबत माहिती  समजल्यानंतर संबंधित  ऑपरेटरला बोलावून त्यास कवलापूर विमानतळ येथे नेण्यात आले.  तेथून त्याचे महिंद्रा स्कार्पियो गाडी मधून अपहरण  करून त्याचा चाकूने भोकसून खून केला होता. घटनेनंतर सदर आरोपी फरार झाले होते.
      याबाबत माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने आज शब्बीर असलम शेख याच्यासह मिरज तालुक्यातील चौघा आरोपींना  ताब्यात घेतले आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण शिंदे, पोलीस हेडकॉन्स्टेबल बिरोबा नरळे,  निलेश कदम, सागर लवटे, संदीप गुरव, अनिल कोळेकर, संतोष गळवे, अजय बेंद्रे, शंकर पाटील यांनी केली.

Post a Comment

0 Comments