धक्कादायक..सांगलीत कंटेन्मेंट झोन तोडला
सांगली प्रतिनिधी
       सांगली शहरातील इंदिरानगर झोपडपट्टी येथे काल शुक्रवारी घेण्यात आलेल्या रॅपिड टेस्ट मध्ये 23  रुग्णाचे कोरोना अहवाल  पाॅझीटीव्ह आले होते. त्यामुळे  हा संपूर्ण परिसर कंटेनमेंट झोन करून या ठिकाणी बॅरिकेट्स उभारण्यात आले होते. मात्र संतप्त नागरिकांनी शनिवारी सकाळी  सर्व बॅरिकेट्स उचकटून टाकले आहेत. त्यामुळे प्रचंड गोंधळाची स्थिती उद्भवली आहे.
          सांगली महापालिका क्षेत्रात कोरोनाचे आता दररोज 70 ते 100 पर्यंत रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे महापालिका क्षेत्रात कोरोना ग्रस्तांची झपाट्याने वाढत आहे.  काल शुक्रवारी महापालिकेच्यावतीने सांगली शहरातील इंदिरानगर झोपडपट्टी येथे रॅपिड अँटिजन टेस्ट घेण्यात आल्या. यामध्ये 23 रुग्ण पाॅझीटीव्ह  आढळून आल्यामुळे हा संपूर्ण परिसरच कंटेनमेंट घोषित करून या ठिकाणी मोठी पत्रे लावून बॅरिकेट्स उभारण्यात आले.  मात्र महापालिकेतर्फे सर्वांची तपासणी करून विनाकारण अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात येत असल्याचा आरोप करत आज  नागरिकांनी हे बॅरिकेड्स तोडून टाकले. त्यानंतर  त्यानंतर दुपारी घटनास्थळी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दरम्यान इंदिरानगर परिसरात मोठ्या तणावाचे वातावरण आहे.पोलीस उपअधिक्षक अशोक वीरकर, नगरसेवक अभिजित भोसले यांनी याठिकाणी भेट देऊन नागरिकांची समजूत घातली. मात्र रॅपीड अँटिजन टेस्ट करुन घेण्यास झोपडपट्टीतील नागरिकांनी ठाम नकार दिला आहे.

Post a comment

0 Comments