Daily Mahasatta

Daily Mahasatta

जगप्रसिद्ध नागपंचमीला ब्रेक

      वाळवा ( हैबत पाटील)       सांगली जिल्ह्यातील शिराळा या गावातील नागपंचमी जगप्रसिद्ध आहे जिवंत नागाची पूजा आणि मिरवणूक खासियत जिवंत नागाची पूजा पाहिला सांगली जिल्ह्यातून नवे तर देश-विदेशातून देखील पर्यटक या ठिकाणी येत असतात मात्र या वेळी पहिल्यांदाच मातीचे नाग आणि केवळ पोलिसांचीच गर्दी असे विदारक चित्र कोरोनामुळे पाहायला मिळाले.शासनाने जिवंत नागाच्या पूजेला बंदी घातल्यानंतर गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी मातीच्या नागाच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढून पालखी सोहळयासह नागपंचमी साजरी होते. मात्र यावेळी सर्वच उत्सवाला फाटा देत घरगुती वातावरणात नाग प्रतिमेचे पूजन करून नागपंचमी साजरी करण्यात आली.कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शिराळा गावात हजारोंच्या संख्येने पोलीस अधिकारी कर्मचारी आणि वन खात्याचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. त्यामुळे  घरोघरी  नागाच्या प्रतिमेची होणारी पूजा आणि भाविकांच्या ऐवजी पोलिसांचीच गर्दी  असे विदारक चित्र शिराळ्यात पहिल्यांदाच अनुभवायला मिळाले. कोरोनाच्या संकटामुळे हे चित्र दिसून येत होते.         खर म्हणजे शिराळा नगरीस महिनाभर अगोदर नागपंचमीचा वेध लागलेले असतात .भाविक ,यात्रेकरू यांची वर्दळ मोठ्या  प्रमाणात असायची ,नागदेवतेच्या मिरवणुकीसाठी प्रचंड जनसमुदाय महाराष्ट्र, कर्नाटक मधून उपस्थित असायचा पण  कोरोना च्या संकटामुळे या नागपंचमीत सगळे सुन्न होते .   नागपंचमी दिवशी शिराळच्या गृहिणींनी भक्ती भावाने आपल्या लाडक्या भावाची म्हणजेच मातीच्या नागाची पूजा केली. येथील नागपंचमीचा मुख्य गाभारा असणाऱ्या पांडुरंग  महाजन यांच्या घरात प्रशासनाच्या सूचनेनुसार मानाची पालखीचे पूजा करण्यात आली. यावेळी मानकरी कोतवाल ,डवरी, भोई उपस्थित होते.यावेळी गृहिणींनी दूध,लाह्या ,दुर्वा ,कापसाचे वस्त्र आदी साहित्यासह विधिवत पूजा केली.तसेच पालखीतील नागराजाचा मुखवटा आणि मानाचा सराफ यांनी दिलेल्या नागाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याचे पौराहित्य नागेश जोशी यांनी तर रामचंद्र महाजन यांच्या घरी  संतोष जोशी  यांनी केले.त्यानंतर पालखीला सुरुवात झाली ,ही पालखी  प्रशासनाच्या सूचनेनुसार मानकरी यांच्या उपस्थितीत पुलगल्ली , गुरुवार पेठ,कुरणेगल्ली,सोमवारपेठ आदी मार्गावरून फिरून ग्रामदेवता आंबामाता मंदिरात पोहचली.पालखी मंदिरात पोहचल्यानंतर त्या ठिकाणी आंबामाता व नागराजाची आरती करण्यात आली.तेथून पालखी परत महाजन कुटुंबियांच्या घरात पोहचली .कोणतीही अनुचित घटना घडू नये या करिता ग्रामदेवता आंबामाता मंदिर व शिराळा शहर परिसरात वन विभाग , पोलीस व महसूल प्रशासन यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Post a Comment

0 Comments