Daily Mahasatta

Daily Mahasatta

डोंगराई दूध संघाच्या जनरल मॅनेजरपदी दीपक मोहिते


कडेगाव : प्रतिनिधी
डोंगराई दूध संघाच्या जनरल मॅनेजरपदी दिपक मोहिते यांची निवड करण्यात आली. तसेच डेअरी मॅनेजर पदी प्रताप पाटील आणि अकाउंट विभाग इनचार्ज पदी सौ. छाया घाडगे यांचीही निवड करण्यात आली. निवड झालेल्या सर्व सत्कारमुर्तीचे स्वागत व सत्कार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.
       संग्रामसिंह देशमुख म्हणाले, दीपक मोहिते यांचा दूध संघाच्या जडणघडणीत मोलाचा वाटा आहे. ते गेली अठरा वर्ष झाले. दूध व्यवसायात काम करत आहेत. त्यांचा दूध धंद्याचा असलेला अभ्यास आणि त्यांच्या अंगी असलेला प्रामाणिकपणा, कर्तव्याशी असलेला एकनिष्ठपणा याची दखल घेवून त्यांना दूध संघातील अतिशय महत्त्वाच्या पदावरती काम करण्याची संधी दिली आहे. दूध धंद्या समोरील अडचणींचा अभ्यास करून दूध संघाची प्रगती करण्यासाठी प्रयत्न करावा.
     यावेळी दूध संघाचे अध्यक्ष तानाजी जाधव, उपाध्यक्ष राजकुमार निकम, चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर मोरे, रमेश कदम, संदेश दंडवते, अजित यादव यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments