Daily Mahasatta

Daily Mahasatta

अमरापूर उपसरपंच रुक्मिणी जानकर यांचा राजीनामाअमरापूर : उपसरपंच सौ.रुक्मिणी जानकर यांनी 
 सरपंच सुनिल पाटील यांच्याकडे राजीनामासपूर्द केला . .

कडेगाव,  (सचिन मोहिते )
अमरापूर (ता .कडेगाव ) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सौ.रुक्मिणी जानकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा सरपंच सुनिल पाटील यांच्याकडे सपूर्द केला . गेल्या अडीच वर्षांपूर्वी झालेल्या अमरापूर ग्रामपंचायत निवडणुकीत  काँग्रेसने एकहाती सत्ता संपादन केली होती . त्यावेळी लोक नियुक्त सरपंच म्हणून सरपंच सुनिल पाटील तर उपसरपंचदी सौ.रुक्मिणी जानकर यांची निवड करण्यात आली होती . परंतु त्यांवेळी सर्व सदस्यांना उपसरपंच पदाची समान संधी देण्याचे ठरल्याप्रमाणे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
यावेळी बोलताना उपसरपंचदी सौ.रुक्मिणी जानकर म्हणाल्या की, गेल्या अडीच वर्षांच्या कालावधीत आमचे नेते मंत्री डॉ . विश्वजीत कदम , आमदार मोहनराव कदम ,शांताराम कदम ,डॉ .जितेश कदम यांच्या मार्गदशनाखाली गावात विविध विकास कामांच्या माध्यमातून लाखो रुपयांचा विकास निधी आणून गावच्या विकास कामांना चालना दिली आहे . सध्या गावात अजूनही काही कामे प्रलंबित आहेत . ते मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहाणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले .यावेळी अँड. शरद मोरे , विजय रुपनर , कडेगाव तालुका युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुरेश शिंगटे ,सचिन मोरे - पाटील,संतोष रुपनर ग्रामपंचायत सदस्य  सचिन पवार , विजय मोरे , जयवंत रुपनर , सौ .दिपाली मोरे , बबन आंबवडे , सौ . रंजना पवार ,ग्रामसेवक लिना देशमुख उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments