डाॅ. प्रमोद महाडीक यांचे शास्त्रशुद्ध विश्लेषण
सांगली (प्रतिनिधी )
' पाणी म्हणजे जीवन ' म्हणून आपण सर्वजण आपल्या आरोग्यासाठी नेहमी स्वच्छ व शुद्ध पाणी पीत असतो .परंतु पाणी पिताना दिवसभरात नेमके किती पाणी प्यावे? असा सर्वांनाच पडणारा एक प्रश्न असतो ?
तर मंडळी आता आपण समजावून घेऊया की पिण्याच्या पाण्याबद्दल शास्त्र काय सांगते ?आयुर्वेदामध्ये पिण्याच्या पाण्याबद्दल अतिशय सुस्पष्ट शब्दात योग्य मार्गदर्शन केले आहे.
शास्त्र असे सांगते की दिवसभरात ज्यावेळी शरीराला पाण्याची गरज पडते त्यावेळी तहान लागते म्हणजेच तहान लागणे हा पाण्यासाठीचा इंडिकेटर आहे. ज्यावेळी तहान लागते त्याचवेळी व जेवढी तहानेची गरज आहे तेवढेच पाणी प्यावे . थोडक्यात जशी मागणी तसा पुरवठा हाच नियम आहे पाणी पिण्यासाठी!!
आयुर्वेदामध्ये सुस्पष्ट पद्धतीने सांगितले आहे की नेहमी निरोगी माणसाने देखील शरीराच्या गरजेइतकेच म्हणजेच तहाने प्रमाणे पाणी प्यावे.
फक्त तीव्र उन्हाळा असताना उष्णते शेजारी काम असताना किंवा खूप कष्टाची कामे होऊन घाम जास्त जात असेल तर थोडे जास्त पाणी पिले तर चालते..परंतु मंडळी सध्याच्या काळात पिण्याच्या पाण्या बद्दल अनेक प्रकारचे गैरसमज पसरले आहेत .त्यामुळे अतिशय गंभीर स्वरूपाचे आरोग्याचे नुकसान होत आहे.
शक्यतो आरोग्यविषयक कोणतीही समस्या असेल व त्यामध्ये विशेषता पोटाच्या पचनाच्या तक्रारी असतील तर सर्वात आधी फुकट चा सल्ला म्हणून भरपूर पाणी प्या किंवा दिवसात कमीतकमी पाच लिटर पाणी प्यावे असा स्वस्तातला सल्ला दिला जातो व लोकांच्या कडून अमलात सुद्धा आणला जातो. आणि मग हा सल्ला अमलात आणताना काही लोक सकाळी उपाशीपोटी तांब्याभर पाणी पितात, तर काही लोक आंघोळ झाल्यावर आणखी पाणी पितात .
जेवताना व जेवणाच्या शेवटी सुद्धा तांब्या दोन तांबे पाणी पितात. दिवसभरात अगदी ठरवून चार पाच लिटर पाणी संपवतात. कित्तेक लोक ही सवय वर्षानुवर्ष सुरू ठेवतात आणि मग स्वतःचे आरोग्य स्वतःच्या हाताने बिघडवून ठेवतात.आता आपण समजावून घेऊया की दिवसभरात अतिरिक्त पाणी पिण्यामुळे शरीरावर कोण कोणते दुष्परिणाम होतात
👇👇👇👇👇
अतिरिक्त पाणी पिण्याचे दुष्परिणाम
मुद्दा क्र 1
आपण तोंडातून टाकलेला कोणताही पदार्थ मग अन्न असो वा पाणी असो ते हे पाचक पित्ताला पचवावे लागते. त्यामुळे आपण विनाकारण पाणी पिल्यामुळे पचनशक्तीवर ताण येतो व पचनसंस्था हमखास बिघडते व आम्लपित्तासारख्या विविध पोटाच्या तक्रारी त्रास द्यायला सुरुवात करतात.
मुद्दा क्र 2
आपण पाणी पिले आणि ते लघवी मार्गे निघून गेले अशी शरीर यंत्रणा नसते. त्यामुळे अतिरिक्त पाणी पिण्यामुळे जास्त प्रमाणात लघवी तयार होते आणि मग ती लघवी बाहेर टाकण्यासाठी किडनी वरती लोड येतो. किडनीला क्षमतेपेक्षा जास्त काम करावे लागते. कालांतराने किडनी फेल होणे अशा गंभीर आजाराला सुद्धा आपली किडनी बळी पडू शकते.
मुद्दा क्र 3
दिवसभरात भरपूर पाणी पिण्यामुळे ते पाणी शरीराच्या पेशी मध्ये साठून रहायला लागते आणि मग त्यामुळे वजन वेगाने वाढते, शरीर सुजायला लागते शरीरामध्ये खूप जडपणा येतो व त्यामुळे हृदयावर सुद्धा ताण येतो.
अशा पद्धतीने तुम्ही तहानेपेक्षा जास्त पाणी पीत असाल तर तुमची पचनसंस्था बिघडते ,किडनी वरती ताण येतो, वजन वाढते, संपूर्ण अंग सुजते, ह्दयावर ताण येतो.
म्हणून मंडळी तुम्ही सावध व्हा...
भरपूर पाणी पिण्याच्या दुषप्रचाराला बळी पडू नका आणि तहाने प्रमाणे योग्य प्रमाणात पुरेसे पाणी पिऊन आपल्या पचन संस्थेचे रक्षण करा व आरोग्याचे रक्षण करा....
डॉ प्रमोद महाडिक, ॲसिडिटी क्लिनिक,
विटा .जि. सांगली मोबा. 9011261920
0 Comments