Daily Mahasatta

Daily Mahasatta

कोरोनाबाबत गांभीर्य बाळगा : विराज नाईक    सांगाव (ता. शिराळा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बसवलेल्या 
    सॅनिटायझर मशिनचे उदघाटन करताना युवा नेते विराज नाईक. 

शेडगेवाडी ( याकुब मुजावर  ) 
      : कोरोना विषाणू संसर्गाबाबत गांभीर्याने काळजी घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन युवा नेते विराज नाईक यांनी केले. कणदूर, ढोलेवाडी, वाडीभागाई व सागाव (ता. शिराळा) येथील जिल्हा परिषद शाळांना मोफत सॅनिटायझर माशिनचे वाटप प्रसंगी ते बोलत होते.    
         यावेळी सभापती वैशाली माने व विश्वासचे संचालक मानसिंग पाटील प्रमुख उपस्थित होते.युवा नेते नाईक म्हणाले, कोरोनाच्या विरोधातील लढाई ही शिस्तबद्ध पध्दतीने पुढं जाऊन आपण नक्की जिंकू असा विश्वास यावेळी दादांनी व्यक्त केला. शिक्षकांनी ऑनलाईन पद्धतीचे शिक्षण प्रणाली राबवावी. शक्य असल्यास गरीब मुलांना त्यांचे घरी जाऊन अभ्यास घ्यावा. नागरिकांनी कोरोनाबाबत हलगर्जीपणा बाळगू नका. मास्कचा व सॅनिटीझरचा वापर अनिवार्य आहे. शासनाकडून वेळोवेळी मिळणाऱ्या सूचनांचे पालन करावे. वृद्ध व्यक्ती व लहान मुलांची विशेष काळजी घ्या. 
         स्वागत व प्रास्तविक सरपंच तात्या पाटील यांनी केले. सागाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बसवलेल्या सॅनिटायजर मशिनचे उदघाटन झाले. वृक्षारोपण करून ग्रामपंचायत ने बसवलेल्या सी.सी. टी. व्ही कॅमेरे कंट्रोल केबिनचे विराज नाईक यांनी उदघाटन केले.या वेळी सागाव येथे वारणा बँकेचे संचालक बळी दाजी, कार्यकारी संचालक राम पाटील, संचालक संकपाळ, माजी जी. प. सदस्य जगन्नाथ लोहार, माजी सरपंच रामचंद्र संकपाळ, सोसायटीचे याअध्यक्ष शशिकांत पाटील, बाजार समितीचे संचालक बाबासो पाटील, जयसिंग पाटील, विनायक दिवे, अजित कांबळे, शिवाजी लोहार तर, कणदूर येथे बाजार समितीच्या उपसभापती नंदाताई पाटील, सरपंच शोभाताई पाटील, प्रचिती दूध संघाचे संचालक मानसिंग पाटील व बबन पाटील, माजी सरपंच संजय पाटील, उपसरपंच आनंदराव पाटील, विष्णू पाटील, आनंदा पाटील, भागाईवाडी चे उपसरपंच रामचंद्र पाटील, श्रीकांत पाटील, उत्तम पाटील, तानाजी पाटील, अक्षय पाटील आदी उपस्थित होते. आभार उपसरपंच सत्यजित पाटील यांनी मानले.
................................


Post a Comment

0 Comments