Daily Mahasatta

Daily Mahasatta

कुपवाड मध्ये दारू साठा जप्तकुपवाड( प्रतिनिधी )
      अहिल्यानगर येथे काल रात्री कुपवाड पोलिसांनी धाड टाकून दारूच्या बाटल्या व रोख रक्कम असा  2 हजार 500 रुपयांचा मुद्दे माल हस्तगत केला.
     कुपवाड एम आय डी सी पोलीस कर्मचाऱ्यांना अहिल्यानागर मध्ये पान टपरी च्या पाठीमागील बाजूस   बेकायदेशीरपणे  दारूची विक्री होत होत असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्या ठिकाणी छापा टाकला. यावेळी संशयित आरोपी महादेव रामचंद्र सूर्यवंशी वय वर्ष 68 रा अहिल्यानगर कुपवाड हा दारू ची विना परवाना विक्री करीत असल्याचे आढळून आले. त्याच्याकडे 832 रुपये किमतीच्या टॅंगो पंचच्या16 बाटल्य  तसेच थ्री एक्स ड्रेमा  कंपनीच्या 1040 रुपये किमतीच्या 20 बाटल्या असा सुमारे 2542 रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. सदर व्यक्ती बेकायदेशीररीत्या दारूची विक्री करीत असल्याचे स्पष्ट झाल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस शिपाई इंद्रजीत केळकर यांनी फिर्याद दिली असून असून अधिक तपास पोलीस नाईक माने करत आहेत.

Post a Comment

0 Comments