Daily Mahasatta

Daily Mahasatta

सोनवडेत बिबटयाच्या हल्ला.
शेतकरी वर्गात पसरले भितीचे वातावरण.

चांदोली(प्रतिनिधी )

      सोनवडे ता. शिराळा येथील मातोश्री फार्म हाऊस  मधील कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून ठार केले.रविवारी रात्री फार्म हाऊसवरील तीन कुत्री बाहेर मोकळी सोडली होती. त्यातील एका कुत्र्यावर सोमवारी पहाटे तीनच्या दरम्यान बिबट्याने हल्ला केला.कुत्र्याला बिबट्याने फरफटत नेऊन ठार केले.त्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.
        सोनवडे ता.शिराळा येथे डी.आर.जाधव यांचे  मातोश्री फार्म हाऊस आहे.तेथे राखणीसाठी त्यानी कारवान जातीची कुत्री पाळलेली आहेत.दिवसा हि कुञी बंदीस्त असतात.व रात्रीच्यावेळी त्यांना बाहेर मोकळी सोडली जातात.सभोवताली झाडी,ऊस पिके आहेत.अशातच सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास बिबट्याने त्यातील एका पाळीव कुत्र्यावर हल्ला करून त्याला लांब फरकटत नेऊन ठार केले.
    घटनास्थळी बिबटयाच्या पायांचे ठसे उमटले आहेत.या घटनेमुळे परिसरातील शेतकरी वर्ग भितीच्या छायेखाली आहे.पंधरा दिवसापुर्वी मणदुर येथे पाळीव कुञ्यावर बिबटयाने हल्ला करुन जखमी केले होते.तर आठ दिवसापुर्वी आरळा भाष्टेवाडी येथे शेळीवर बिबटयाने हल्ला करुन ठार मारले होते.तर सोनवडे पैकी खोतवाडी येथे चार दिवसापुर्वी बिबटया दगडावर बसल्याचे युवक शंकर मोहीते यांनी सांगीतले वारंवार होणाऱ्या बिबटयाच्या हल्ल्याने शेतकरी वर्ग भयभीत झाला आहे.
       सध्या परीसरात पावसाच्या उघडीपीमुळे शिवारात भात भांगलणीची कामे गतीने सुरु आहेत.परंतु बिबटयाच्या वावरामुळे शेतकरी वर्ग शेतीची कामे निम्म्यातच सोडुन घरी परतताना दिसत आहेत.यासंदर्भात फार्म हाऊसचे मालक डी.आर.जाधव यांनी तातडीने चांदोली वन्यजीव कार्यालयात व शिराळा वन विभागास घटनेची माहिती दिली आहे.घटनास्थळी वन विभागाने सापळा लाऊन बिबटयाला जेरबंद करावे अशी मागणी फार्म हाऊसचे मालक डी.आर.जाधव यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments