Daily Mahasatta

Daily Mahasatta

विट्यातील भीषण अपघात एक ठार, चार जखमी

                   
विटा - अपघातात चक्काचूर झालेली स्विफ्ट कर छायाचित्रात दिसत आहे.

: जखमीत पारे गावच्या माजी सरपंचासह चौघांचा समावेश
विटा, प्रतिनिधी
          विटा तासगाव रस्त्यावरील ग्रामीण रुग्णालयाच्या पुढील वळणावर मारुती स्विफ्ट कार पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात पारे येथील अजय कालिदास गुरव वय-26 हा युवक जागीच ठार झाला तर  अन्य चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवार रात्री 10 वाजण्याच्या सुमारास  ही घटना घडली.
         याबाबत अधिक माहिती अशी पारे येथील  पाच पाच युवक आपल्या स्विफ्ट कारने विटा येथून  तासगाव च्या दिशेने भरधाव वेगाने निघाले होते. यावेळी ग्रामीण रुग्णालयाच्या पुढील बाजू असलेल्या मारुती सुझुकी च्या शोरूम जवळील वळणावर या कारच्या चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे कार सुमारे दोनशे फुटापर्यंत  अनेक पलट्या खात साईडला जाऊन आदळली.
           हा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरश चक्काचूर झाला आहे. यामध्ये पाठीमागे बसलेल्या अजय कालिदास गुरव  हा युवक जागीच ठार झाला. तर अजित बबन माने आणि अजय जोतिराम लवळे,  हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. मारुती स्विफ्ट मधील एअर बॅग उघडल्यामुळे चालक अमर संपत कदम आणि पवन संजय साळुंखे हे पुढे बसलेले दोघे मात्र किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातानंतर रात्री अकराच्या सुमारास सर्व जखमींना विट्यातील ओम श्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मयत अजय गुरव याचा मृतदेह विटा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या अपघातामध्ये स्विफ्ट कार चा पूर्ण चुराडा  झाला आहे.  कार मधील वस्तू दोनशे फूट अंतरात सर्वत्र विस्कटलेले आहेत. तर कार जवळ रक्ताचा खच पडल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. हे युवक सांगलीच्या दिशेने नेमके कशासाठी चालले होते?  हे मात्र अजून समजून आले नाही.
  मयत अजय कालिदास गुरव हा एकुलता एक मुलगा असून त्याचे वडील लहानपणीच वारले आहेत सध्या त्याची आई आणि तो असे दोघेच घरात होते.त्याच्या निधनामुळे गुरुवचे संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडले आहे.  तर जखमी मधील पवन संजय साळुंखे हे पारे गावचे माजी सरपंच आहेत.

Post a Comment

0 Comments