कुपवाड मध्ये एकाच कुटूंबात पाचजण कोरोना पॉझिटिव्ह..    कुपवाड प्रतींनिधी
     तीन दिवसांपूर्वी कुपवाड मधील कोरोना पॉझिटिव्ह झालेले दोन नागरिकांच्या कुटूंबातील पाच लोकांचा दि 24 जुलै रोजी  स्वाब टेस्ट करण्यासाठी घेतला होता. आज दिनांक 26 जुलै रोजी  कुपवाड शहरातील 55 वर्षीय पुरुष  ,20 वर्षीय मुलगा ,23 वर्षीय मुलगी  ,43 वर्षीय स्त्री सर्व राहणार हनुमान नगर कुपवाड व 33 वर्षीय पुरुष ( मुंबई ) सध्या  राहणार हनुमान नगर कुपवाड यांना कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा यांचा अहवाल आज रोजी प्राप्त झालेने तो अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. 
     त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी मिरज सिव्हील हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले आहे.तसेच त्यांचे संपर्कात आलेले १५ लाेकांना संस्थात्मक अलगीकरण कक्षात ठेवणेसाठी ताब्यात घेणेत येत आहे. 
         सदर ठिकाणी सा. मी कु. मनपा यांचे उपायुक्त व मनपाचे वैद्यकीय अधिकारी येथे भेट दिलेली असून सदर ठिकाणी प्रतिबंधात्मक क्षेत्र निर्माण करून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेले आहे.

Post a comment

0 Comments