रिपोर्ट का येत नाही, वारंवार कशाला तपासता..अन् गेले की चक्क तहसीलदाराच्या अंगावर...मग काय...

media.graytvinc.com/images/810*607/coronavirus1... याबाबतची माहिती अशी की, जाऊ ता. निलंगा येथी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकासाठी असलेली निवासी शाळा संस्थात्मक विलगीकरणासाठी घेण्यात आली. या विलगीकरण कक्षात कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना संस्थात्मक विलगीकरण म्हणून ठेवले जाते. सध्या येथे बाधित रुग्णाच्या संपर्कातील ५२ जण आहेत. 

या विलगीकरण कक्षाला येथील तहसीलदार गणेश जाधव यांनी सकाळी पावणे अकराच्या सुमारास भेट दिली.तेथील मुस्तफा खुर्शीद लष्करे, आरिफ खुर्शीद पटेल, आतीक खाजा पटेल (रा.औराद शहाजानी) सय्यद शाकीब दुरानी, सय्यद सुभानी समदानी खान (रा. निलंगा) या पाच जणांनी आमचा तपासणीस पाठवलेला रिपोर्ट का येत नाही. तुम्ही वारंवार आमची तपासणीचे नमुने का घेता म्हणून मारहाण करण्याच्या उद्देशाने तहसीलदार गणेश जाधव यांच्या अंगावर धावून गेले.

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

त्यांना धमकी देऊन त्यांच्या शासकीय कामात अडथळा आणला. विलगीकरण कक्षात असताना वैद्यकीय अधिकाऱ्याची परवानगी शिवाय बाहेर येता येत नाही. तरीही कोणतीही परवानगी न घेता विलगीकरण कक्षाच्या बाहेर येऊन गोंधळ घातला.  साथरोग आदेशाचे उल्लंघन करून कसलीही खबरदारी न बाळगता मानवी जीवितास धोका निर्माण करून जीवित व व्यक्तिगत सुरक्षा धोक्यात येईल असे वर्तन करून धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

Post a comment

0 Comments