Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची मोठी वाढ होणार

सांगली प्रतिनिधी

         : आगामी  काही दिवसात सांगली जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या अधिक वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात पुन्हा लॉकडाउन सुरू करण्याच्या मनस्थितीत आम्ही नव्हतो. मात्र काही भागात जास्त रुग्ण वाढल्याने  लॉकडाऊन घोषित करत आहोत, अशी माहिती सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.
              मंत्री जयवंतराव पाटील म्हणाले, २२ जुलै रोजी रात्री १० वाजता लॉकडाऊन सुरू होणार आहे. ३० जुलै रोजी रात्री १० वाजेपर्यंत हा लॉकडाऊन सुरू राहणार आहे. सांगली मिरज सारख्या मनपा, नगरपालिका, नगरपंचायत या भागात कडक लॉकडाऊन लागू केला जाईल तर ग्रामीण भागातील लोकांनी जनता कर्फ्यू पाळावा.
       सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून लॉकडाउन संदर्भातील सविस्तर माहिती दिली जाईल. योग्य नियमावली जाहीर केली जाईल. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आम्हाला हा सक्तीचा निर्णय घ्यावा लागला आहे. आपल्या जिल्ह्यातील लोकांच्या स्वास्थ्यासाठी सर्वांनी कटाक्षाने नियम पाळावेत, असे आवाहन मंत्री जयंत पाटील यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments