विट्यातील भाजी विक्रेता कोरोना पॉझिटिव्ह
विटा -3 आणि मादळमुठी-2 असे 5 जण पॉझिटिव्ह 

विटा प्रतिनिधी
       विटा  शहरातील एका भाजीविक्रेत्यासह त्याच्या   14 वर्षाच्या  मुलीचा आणि 65 वर्षाच्या आईचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव आला आहे त्यामुळे विट्यात आज एकाच दिवशी तिघांचे  तर मादळमुठी येथील दोघांचे असे पाच लोकांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
       विटा शहरातील  मंडई मधील भाजीविक्रेत्याला कोरोनाची बाधा झाली आहे. तसेच या भाजीविक्रेत्यासह  मुलगी आणि आई असं तिघांचा कोरोना अहवाल  पॉझिटिव आला आहे. तसेच मादळमुठी येथील 14 वर्षाची मुलगी आणि 65 वर्षाचा वृद्ध असे दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत
        खानापूर तालुक्यात आज पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे विटा शहरातील भाजी मंडईमध्ये भाजी विक्री करणाऱ्या एका 45 वर्षीय भाजीविक्रेत्यांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा भाजी विक्रेता भाजी मंडई आणि शहरात फिरुन भाजी विक्री करत होता.  तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल लोखंडे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

Post a comment

0 Comments