Daily Mahasatta

Daily Mahasatta

बकरी ईदची नमाज घरीच अदा करावी

: उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक  वीरकर यांचे आवाहन

कुपवाड (प्रतिनिधी)
     संजयनगर पोलीस ठाण्यात बकरी ईद निमित्त उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक  वीरकर यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.
         याबाबत  माहितीअशी, आज मंगळवारी सायंकाळी बकरी ईद निमित्ताने संजयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मस्जिद मधील इमाम, मुस्लीम समाजातील प्रतिष्ठित नागरिक व मौलवी यांची बैठक पार पडली. यावेळी बकरी ईद साजरा करण्याबाबत आवश्यक सुचना देण्यात आल्या.
     बकरी ईद ची नमाज प्रत्येकांनी आपापल्या घरीच अदा करावी, मस्जिद अगर घराच्या टेरीसवर कोणीही नमाज पठण करू नये, ईद दिवशी करण्यात येणारी बकर्यांची कुर्बानी सार्वजनीक ठिकाणी न करता आपापल्या घरी करावे, बकरी विकत घेण्यासाठी गर्दी न करता घरीच मागवून घ्यावी, कुर्बानी केलेली बकर्यांची घाण इतरत्र कुठेही न टाकता महानगरपालिकेच्या घंटा गाडीत टाकावी, मटण तयार केलेले दुसर्यांना  देताना फक्त घरातील एकाच व्यक्तीने मित्रांना अगर नातेवाईकाना द्यावे, सण साजरा करताना कोरोना विषाणू अनुषंगाने शासनाने काढलेल्या परिपत्रकचे पालन करून सोशल डिस्टन्स व सॅनिटाईजर वापर करावा,वाहन चालवताना फक्त त्या वाहनावर एकाच व्यक्तीने प्रवास करावा. तरुण मुलांनी विनाकारण घरा बाहेर पडू नये व बकरी ईद घरीच साजरा करावा इतरांच्या घरी जाऊ नये इत्यादी सूचना मा उपविभागीय पोलीस अधिकारी वीरकर यांनी  बैठकित दिल्या .
    यावेळी या बैठकीचे नियोजन संजयनगर पोलीस ठाण्याचे ए. पी. आय.  काकासो पाटील यांनी केले.

Post a Comment

0 Comments